प्रतिनिधी/ बेळगाव
मल्लापूर पीजी (ता. गोकाक) येथे गांजा विकणाऱया एका युवकाला घटप्रभा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याच्या जवळून 530 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
गुलामहैदर नबाबअली इराणी (वय 36, रा. मल्लापूर पीजी) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून पोलीस उपनिरीक्षक एच. वाय. बालदंडी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. त्याच्यावर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा 1985 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.