ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कर्नाटकातील प्रभावी दलित नेते आणि काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांना काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.
खर्गे यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे.
खर्गे यांनी यापूर्वी लोकसभेतही त्यांनी काँग्रेसचे नेतृत्व यशस्वीपणे सांभाळले होते. 17 जून रोजी होणाऱ्या कर्नाटक राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांना संधी देण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये समाधान आहे.
दरम्यान, काल मध्यप्रदेशातील भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री बेलेंदू शुक्ला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या अचानक प्रवेशाने मध्यप्रदेश भाजपला मोठा धक्का बसला आहे. मध्यप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या उपस्थितीत शुक्ला हे भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. तर दुसरीकडे गुजरातमध्ये मात्र काँग्रेस आमदारांचे राजीनामासत्र सुरूच आहे. गुजरातमध्ये मार्चपासून काँग्रेसच्या 8 आमदारांनी राजीनामे दिले आहेत.