ऑनलाईन टीम / पॅरिस :
देशातील बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पलायन केलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याची फ्रान्समधील मालमत्ता सक्त वसुली संचालनालयाने जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत 1.6 दशलक्ष युरो म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 14 कोटी रुपये आहे.
मल्ल्या 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून मार्च 2016 पासून ब्रिटनमध्ये आहे. 18 एप्रिल 2017 पासून स्कॉटलंड यार्डकडून प्रत्यार्पण वॉरंटमध्ये जामिनावर आहे. भारताकडून मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनवर दबाव वाढत आहे. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल आणि दक्षिण आशियाविषयकपरराष्ट्र मंत्री लॉर्ड तारिक अहमद यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली असून, कायदेशीर समाधान झाल्याशिवाय मल्ल्याला भारताच्या स्वाधीन करणार नाही, अशी भूमिका ब्रिटनने घेतली आहे.
दरम्यान, मल्ल्याने बँकांची कर्ज फेडण्यास तयारी दर्शवली आहे. मात्र, ब्रिटन सरकार त्याचे म्हणणे फेटाळून लावत आहे.