वॉरसॉ : पोलंड खुल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताचा मल्ल रवी दाहियाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत उझ्बेकच्या गुलमोजन अब्दुल्लाएवने रवी दाहियाचा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. या अंतिम लढतीत अब्दुल्लाएवची चांगलीच दमछाक झाली होती पण त्याचा लाभ रवी दाहियाला उठविता आला नाही. या पहिल्या फेरीमध्ये रवी दाहियाने अब्दुल्लाएववर आघाडी घेतली. शेवटच्या फेरीत अब्दुल्लाएवने रवी दाहियावर 5-3 अशा गुणांनी मात करत सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत पहिल्या लढतीत रवी दाहियाने अब्दुल्लाएवचा 10-1 व दुसऱया लढतीत कझाकस्तानच्या ऍसकेरोववर 13-8 अशा गुणांनी मात केली होती.
Previous Articleबीस साल बाद..! माय-लेकरांची भेट!!
Next Article हिंदुस्थान युनिलिव्हरच्या सीएमडींच्या वेतनात घट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.