प्रतिनिधी/ सातारा
शहरातील मल्हारपेठ व गुरुवारपेठ येथील नागरिकांना कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पत्रकार संतोष शिंदे यांनी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदनात देऊन केली आहे. त्या मागणीला जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच केंद्र सुरू करू, असे लेखी पत्राद्वारे पत्रकार संतोष शिंदे यांना कळवण्यात आले आहे
मल्हारपेठ व गुरुवारपेठ येथील नागरिकांना लसीकरण करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना देखील कोरोना लसीकरणाच्या रांगेत ताटकळत उभा राहावे लागते. तरी देखील त्यांना लास मिळत नाही म्हणून मल्हार पेठ व गुरुवार पेठ येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी काही दिवसांपूर्वी पत्रकार संतोष शिंदे यांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली होती. जिल्हा प्रशासनाने तात्काळ या भागात नागरिकांसाठी स्वतंत्र कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्याचे त्यांना आश्वासन देण्यात आले आहे.