सावंतवाडी/प्रतिनिधी –
भाजप चित्रपट कामगार आघाडी सिंधुदुर्गतर्फे 3 व 4 मार्च रोजी एकांकिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जिल्हय़ातील सहा एकांकिका संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. 3 रोजी इंद्रधनू कलामंच दाभोलीची योगेश सोमण लिखित जन्म जन्मानंतर', दाभोली कलामंचची
दिव्यास्त्र’ व सप्तरंग कलामंच होडावडेची प्रभाकर भोगले लिखित गेले भजनाक पोचले लiनाक' या एकांकिका होणार आहेत. 4 मार्च रोजी बाबा वर्दम थिएटर्स कुडाळची नागसेन सकपाळे लिखित
बोझं’, झिरो बजेट प्रॉडक्शन कणकवलीची ऋषिकेश तुराई लिखित कॅलिडोस्कोप' व शेवटी ढ मंडळी पिंगुळीची तेजस मसके लिखित
बिलिमारो’ या एकांकिका होणार आहेत.
एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन 3 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जि. प. महिला बालविकास सभापती शर्वाणी गावकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, जि. प. चे माजी सभापती प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत होणार आहे. मळगाव हायस्कूलच्या पटांगणावर या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन भाजप चित्रपट कामगार आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष गीतेश शेणई, माfहला जिल्हाध्यक्ष नमिता गावकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मोहन गवस व जिल्हा सरचिटणीस अंकित प्रभूगावकरयांनी केले आहे.