ओटवणे / प्रतिनिधी:
मळगाव-रेडकरवाडी येथील श्री इसवटी प्रसाद मित्रमंडळाच्यावतीने पुरबाधित बांदा, निगुडे-पाटीलवाडी, ओटवणे, सरमळे, माडखोल धवडकी, विलवडे येथील ५० पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे वितरण करण्यात आले.
सामाजिक बांधिलकीच्या दरवर्षी या मंडळाच्यावतीने समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. यावेळी श्री इसवटी प्रसाद मित्रमंडळाचे पुरग्रस्तानी आभार मानले.
यावेळी मंडळाचे हनुमंत पेडणेकर, विष्णू पेडणेकर, विनय पेडणेकर, विवेक पेडणेकर, सचिन रेडकर, सतीश रेडकर, अच्युत रेडकर, संतोष उर्फ बाप्पा रेडकर, कौस्तुभ उर्फ पप्या रेडकर, अभी रेडकर, रामचंद्र उर्फ बबन रेडकर, अनिकेत रेडकर, भगवान उर्फ दाजी रेडकर, महेंद्र रेडकर, राजू रेडकर, संदेश रेडकर, सुचित्रा रेडकर, मंदार मुंडये, सर्वोत्तम उर्फ बाळू सातार्डेकर, प्राची सातार्डेकर, प्राप्ती सातार्डेकर, श्यामसुंदर सातार्डेकर, दिवाकर सातार्डेकर, अमोद मांजरेकर, दिवाकर खानोलकर, प्रशांत राणे आदी उपस्थित होते.