ओटवणे/ प्रतिनिधी-
तब्बल बारा दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मळगाव घाट रस्ता अखेर शनिवारी सायंकाळ पासून सर्व वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
सोमवार २१ जून पासून मळगाव घाट रस्त्यातील मोरीचे बांधकाम सुरू होते. चार दिवसापूर्वी दुचाकी व कार वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र शनिवारी या मोरीचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यात आले. पावसाचे दिवस असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या अथक प्रयत्नानंतर काम पूर्णत्वास आले. त्यामुळे प्रवाशातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.