सावंतवाडी/प्रतिनिधी –
सावंतवाडीकडे येत असलेली स्विफ्ट डिझायर कार मळगाव घाटीतील दरीत कोसळून अपघात झाला. ही घटना मंगळवारी दुपारी 1. वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात गाडीचा पूर्णत चक्काचूर झाला आहे.मात्र सुदैवाने आतील प्रवाशांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस घटनास्थळी रवाना झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, रस्त्यावरील माकडाला वाचवताना संबंधित कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ती कार थेट दरीत कोसळून अपघात घडला. अपघातात गाडीचा चक्काचूर झाल मात्र आतील प्रवासी किरकोळ जखमी झाले याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तर परिसरातील नागरिकांनीसुध्दा त्याठिकाणी मोठी गर्दी करत आतील प्रवाशांन सुखरुप बाहेर काढले.