सावंतवाडी / प्रतिनिधी –
मळगाव घाट मार्ग कोसळला आहे याला पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असून हा मार्ग सध्या बंद करण्यात आला आहे. हा मार्ग मुंबई गोवा नॅशनल हायवे व रेल्वे स्टेशनला जोडणार आहे. तसेच तालुक्यातील बहुतांशी गावे या मार्गावरून जोडली जात आहेत असे असताना हा महामार्ग सध्या वाहतुकीस बंद करण्यात आला आहे त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. पंचायत समितीच्या बैठकीत वारंवार या मार्गाच्या दुरुस्तीबाबत बांधकाम खात्याला सूचना करूनही बांधकाम खात्याने याकडे कानाडोळा केला आहे असे उपसभापती शितल राऊळ यांनी स्पष्ट केले.