साहित्य : 250 ग्रॅम व्हाईट बटन मशरूम, पाव वाटी कांदापातीचा कांदा, 3 हिरव्या मिरच्या चिरून, 1 छोटी सिमला मिरची चौकोनी तुकडे करून, 7 लसूण पाकळय़ा चिरून, 1 इंच आलं किसून, 1 चमचा सोयासॉस, 1 चमचा तेल, अर्धा चमचा कॉर्नफ्लोर, 2 चमचे पाणी, अर्धा चमचा साखर, मीठ चवीपुरते, तेल तळण्यासाठी, बॅटरसाठीः 4 चमचे मैदा, 3 चमचे कॉर्नफ्लोर, पाव चमचा काळीमिरी पावडर, मीठ चवीनुसार
कृती : मशरुम स्वच्छ करून कोरडे करावेत. बाऊलमध्ये बॅटर साहित्यात पाणी मिक्स करून पेस्ट बनवावी. त्यात मशरुम घोळवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळावेत. थोडय़ाशा गरम तेलात कांदा टाकून सोनेरी रंगावर परतवावा. नंतर मशरूम, आलं, लसूण आणि हिरवी मिरची टाकावी. आता सोयासॉस, साखर, मीठ आणि काळीमिरी पावडर टाकून मिक्स करावे. नंतर त्यात तळलेले मशरुम टाकून दोन मिनिटे परतवावे. वरून थोडे पाणी आणि कॉर्नफ्लोर टाकून मिक्स करावे. तयार मशरुम फ्राईड राईस अथवा चपातीसोबत खाण्यास द्या.