वार्ताहर/ केळघर
महाबळेश्वर आगराच्या वतीने शेतकरी, व्यापारी ,लघु व मोठे कारखानदार यांना मालवाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या वतीने ट्रक उपलब्ध करून देण्यात येत असून व्यापायांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक नामदेवराव पतंगे यांनी केले .
एसटी च्या वतीने मालवाहतुकीस प्रारंभ करण्यात आला असून याबाबतीची माहिती देताना ते म्हणाले, शेतकरी,व्यापारी ,छोटे तसेच लघु व मोठे कारखानदार असलेल्या साठी माफक दरात एसटी मालवाहतुकीसाठी ट्रक उपलब्ध करून देणार आहे. राज्यात कुठेही मालवाहतूक करण्यात येणार आहे. मालवाहतुकीसाठी बंद व खुल्या टफ असणारे ट्रक देण्यात येणार आहेत. एसटी च्या या ट्रक मधून एकाच वेळी नऊ टण मालाची वाहतूक करता येणार आहे. महाबळेश्वर आगारात मालवाहतुकीसाठी आगाऊ आरक्षण सुविधा सुरू करण्यात आली असून व्यापारी, शेतकरी यांनी खालील भ्रमणध्वनी वर संपर्क करून मालवाहतुकीसाठी ट्रक चे बुकिंग करावे, असे आवाहनही श्री. पतंगे यांनी केले आहे. संपर्कासाठी क्रमांक पुढील प्रमाणे:श्री. पतंगे (9766241778),वरिष्ठ लिपिक महेश शिंदे(9975633802,8788340296),सहायक वाहतूक निरीक्षक किरण धुमाळ (9923673553,7666723758),अजित जमदाडे लेखनिक (8888410841)तरी शेतकरी ,व्यापारी यांनी महाबळेश्वर आगाराशी संपर्क करून मालवाहतुकीसाठी नोंदणी करावी ,असे आवाहन महाबळेश्वर आगराच्या वतीने करण्यात आले आहे.