स्पाच्या नावाने चालतात हायटेक वेश्या व्यवसायाचे अड्डे : पोलीस अधिकाऱयांचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरात युनिसेक्स स्पाच्या नावे हायटेक वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे सामोरे आले आहे. बेळगाव पोलिसांनी टिळकवाडी व सदाशिवनगर येथे केलेल्या कारवाईनंतर मसाज पार्लरवर करडी नजर ठेवण्यात आली असून मसाज पार्लरच्या नावे मोठय़ा प्रमाणात शरीर विक्रयाचा व्यवसाय चालतो. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर नजर ठेवली आहे.
सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी काँग्रेस रोड, टिळकवाडी येथील नेल्सन हाईट्स अपार्टमेंटमध्ये असलेल्या न्यू गेटवे युनिसेक्स स्पा-मसाज सेंटरवर छापा टाकून प्रकाश यळ्ळूरकर (वय 27, रा. टिळकवाडी), विनायक शिंदे (37, रा. जुने बेळगाव) या दोघा जणांना अटक केली आहे. या सेंटरमधून दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
दुसरी कारवाई एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी सदाशिवनगर येथील शेवटच्या बसस्टॉपजवळ एका घरात परप्रांतीय तरुणींना वाम मार्गाला लावणाऱया मारुती केळगेरी (वय 30, रा. वन्नूर), सिद्धाप्पा चौगुला (वय 33, रा. हुल्लोळी) या दोघा जणांना अटक करून उत्तर प्रदेशमधील एका तरुणीसह दोन महिलांची सुटका केली आहे.
अधिकाऱयांची करडी नजर या दोन्ही कारवायांनंतर मसाज सेंटर चालकांचे धाबे दणाणले असून अनेक जण फरारी झाले आहेत. पोलिसांनी मात्र आता मसाज सेंटरवर बारकाईने नजर ठेवली आहे. कोणत्याही परिस्थितीत स्पा व मसाज सेंटरच्या नावे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा वरि÷ पोलीस अधिकाऱयांनी दिला आहे.