रेनबो आयलँडमधील विचित्र प्रकार
जगातील काही ठिकाणी धोकादायक असूनही अत्यंत सुंदर असतात. यात इराणचे होर्मोज बेट सामील असून ते अत्यंत आकर्षक असून त्याला रेनबो बेट देखील म्हटले जाते. या भूभागाला अनेक प्रकारचे रंग प्राप्त झाले आहेत. पारसच्या आखातातील या रहस्यमय बेटाच्या डोंगरांसोबतच सुंदर समुद्र किनारे एका वेगळय़ा प्रकारची छटा प्राप्त करून देतात. पण या बेटावरील माती मसालेदार आहे.
हे बेट सौंदर्यासह येथे मिळणाऱया खनिजांमुळेही ओळखले जाते. याचमुळे याला भूगर्भशास्त्रज्ञांसाठी डिस्नेलँड देखील म्हटले जाते. येथील टूरिस्ट गाइड येथील मातीची चव चाखण्याचा सल्ला देतात. या बेटावर अनेक ठिकाणी मिठाचे ढिग दिसतात, ज्यात शेल, माती आणि लोहसमृद्ध दगडांचे थर आढळतात. याचमुळे हे क्षेत्र अनेक ठिकाणी लाल-पिवळे आणि नारिंगी रंगांनी चमकताना दिसून येते.
70 प्रकारची खनिजे
येथे 70 प्रकारची खनिजे आढळतात असे सांगण्यात येते. 42 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात प्रत्येक इंच जागेची स्वतःची कहाणी असल्याचे गाइडचे म्हणणे आहे. ब्रिटिश जियोलॉजिकल सर्व्हेच्या प्रमुख भूवैज्ञानिक डॉ. कॅथरीन गुइनफ पूर्वी इराणसोबत काम करायच्या. कोटय़वधी वर्षांपूर्वी फारसचे आखात आणि त्याच्या आसापास उधळ समुद्रांमध्ये मिठाचा थर तयार झाला होता असे त्या सांगतात.
रंगीत भूभागाची निर्मिती
या थरांमध्ये कालौघात परस्परांमध्ये घर्षण झाले आणि तेथे खजिनसमृद्ध ज्वालामुखीय धुळीचे थरदेखील मिळाले. यामुळे तेथे रंगीत भूभाग निर्माण झाला आहे. येथील भूभागाचे आकार अशाप्रकारे तयार झाले आहेत, ज्यामुळे तेथे अत्यंत सुंदर किनारे, डोंगर आणि गुहा निर्माण झाल्या आहेत. याचमुळे होर्मुझला रेनबो बेट देखील म्हटले जाते. खाण्यायोग्य डोंगर असणारे हे जगातील एकमात्र बेट आहे. याची चव चाखण्यासाठी देशविदेशातून पर्यटक येत असतात.
मसाल्याप्रमाणे वापर
येथील अनेक ठिकाणच्या मातीला मसाल्यांप्रमाणे वापरात आणले जाते. यात तेथील डोंगरांवरील गीलॅक नावाची लाल मातीचा समावेश आहे. याचा वापर उद्योगांबरोबरच स्थानिक भोजनात मसाले म्हणून केला जातो. या मसाल्याला लोक तेथील स्थानिक ब्रेडसोबत खात असतात.
सॉस प्रमाणेही वापर
लाल मातीला सॉसप्रमाणेही वापरात आणले जात असल्याचे तेथील लोक सांगतात. या विशेष सॉसला सूरखा म्हटले जाते. याचबरोबर लालमातीचा वापर रंगकाम, कॉस्मेटिक्स आणि सिरॅमिकमध्ये केला जातो. माणिक लाल डोंगराबरोबरच अवाल होर्मुझ्घ्च्या पश्चिमेला मिठाचा डोंगर देखील आहे. या मिठात औषधी गुण असल्याचे मानले जाते.