मस्की/प्रतिनिधी
राज्यात दोन विधानसभा आणि एका लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. १७ एप्रिल रोजी होणाऱ्या पोट निवडणुकीपूर्वी भाजपचे उमेदवार प्रतापगौडा पाटील यांनी बुधवारी मस्की येथे आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
प्रतापगौडा पाटील यांनी २०१९ मध्ये कॉंग्रेसकडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे रायचूर जिल्ह्यातील या मतदारसंघासाठी जागा रिक्त झाली होती. त्यानंतर विधानसभेत या भागाचे कोणतेही प्रतिनिधित्व नव्हते. आता पाटील या मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत.