प्रतिनिधी / कोल्हापूर
महसूल, ऊर्जा व अपारंपारिक ऊर्जा, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री बाळासाहेब थोरात हे आज (दि. ४ जानेवारी) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी १० वाजता पद्मश्री डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथील हेलिपॅडवर त्यांचे आगमन होणार असून तेथून त्यांच्या जिल्हा दौऱ्यास सुरुवात होणार आहे.
मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कोल्हापूर दौऱ्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे..
शनिवार दि. 4 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता पद्मश्री डी. वाय.पाटील हॉस्पीटल येथील हेलीपॅडवर आगमन व आमदार पी. एन.पाटील यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण
10.15 वाजता आमदार पी.एन.पाटील यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव.
10.55 वाजता रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन येथे आगमन व डॉ. पृथ्वीराज संपतराव चव्हाण व संग्रामसिंह संपतराव चव्हाण यांच्या मुलांच्या विवाहास उपस्थिती.
दुपारी 12 वाजता पुरग्रस्तांसाठी केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक ( स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय)
1 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव.
2 वाजता पद्मश्री डी.वाय.पाटील हॉस्पीटल हेलीपॅड येथून हेलिकॉप्टरने पुण्याकडे प्रयाण.
राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील कोल्हापूर दौऱ्यावर
नूतन राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. 4 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या उपाय योजनांबाबत आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय) रात्री 9 वा. मुक्काम (स्थळ : यशवंत निवास, कसबा बावडा).
रविवार दि. 5 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत गाठी भेटी (स्थळ : यशवंत निवास, कसबा बावडा). रात्री 9 वा. मुक्काम (स्थळ : यशवंत निवास, कसबा बावडा).
सोमवार दि. 6 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत गाठी भेटी (स्थळ : यशवंत निवास, कसबा बावडा). सायंकाळी 5 वाजता जिल्हा आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय) रात्री 8 वाजता रेल्वेने मुंबईकडे प्रयाण.