प्रतिनिधी / बेळगाव
महसूलवाढीसाठी शहरातील मोक्मयाच्या ठिकाणी व्यापारी संकुलांची उभारणी करून गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. याचप्रमाणे आता बुडा कार्यालय आवारातदेखील पाच गाळय़ांची उभारणी करण्यात आली असून पूर्णत्वास आले आहेत. त्यामुळे हे गाळे लवकरच भाडेतत्त्वावर देण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बुडाकडे महसूल उत्पन्नाचे साधन नसल्याने विविध ठिकाणी व्यापारी संकुलांची उभारणी करून गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. काही ठिकाणी असलेल्या भूखंडांच्या विक्रीच्या माध्यमातून महसूल जमा करण्यात आला होता. पण कायमस्वरुपी उत्पन्न मिळविण्यासाठी गाळय़ांची उभारणी करण्यात आली आहे. टीव्ही सेंटर, हनुमाननगर अशा विविध ठिकाणी गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. तसेच आता बुडा कार्यालयाच्या आवारातदेखील पाच गाळय़ांची उभारणी केली आहे.
कार्यालय आवारात असलेल्या खुल्या जागेत या गाळय़ांची उभारणी करण्यात आली असून संरक्षक भिंत हटवून गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. या परिसरात रहिवासी वसाहत वाढली आहे. तसेच व्यावसायिक गाळय़ांची संख्यादेखील वाढत आहे. त्यामुळे बुडाने गाळय़ांची उभारणी केली असून गाळय़ांच्या उभारणीचे काम पूर्णत्वास आले आहे. सदर गाळे लवकरच भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. त्यामुळे बुडाला गाळय़ांच्या माध्यमातून प्रतिमहिना उत्पन्न मिळणार आहे.