मनपा कार्यालयातील 40 हून अधिक कर्मचाऱयांच्या कार्यालयांतर्गत बदल्यांमुळे खळबळ
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका कार्यालयातील महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱयांच्या कार्यालयांतर्गत बदल्या झाल्या आहेत. कार्यालयातील 40 हून अधिक कर्मचाऱयांच्या आणि महसूल निरीक्षकांच्या जबाबदाऱयांमध्ये बदल करण्यात आल्याने एकच खळबळ माजली आहे. अचानक सर्व कर्मचाऱयांच्या जबाबदाऱयांमध्ये बदल का? हा निर्णय घेण्यामागचे गौडबंगाल काय? असे विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
मनपा कार्यालयातील महसूल विभागातील कर्मचाऱयांच्या जबाबदाऱयांमध्ये यापूर्वी किरकोळ बदल केला होता. पण सर्व विभागातील कर्मचारी एकाच विभागात वर्षानुवर्षे कार्यरत असल्याची माहिती आयुक्तांना मिळाली आहे. काही कर्मचारी आपल्या जबाबदाऱया व्यवस्थित पार पाडत नसल्याच्या तक्रारी मनपा आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत. यामुळे महापालिका कार्यालयातील सर्व विभागातील कर्मचाऱयांच्या अंतर्गत बदल्या करण्याचा निर्णय आयुक्त रुद्रेश घाळी यांनी घेतला आहे. विशेषतः महसूल विभागातील सर्व कर्मचाऱयांच्या जबाबदाऱयांमध्ये बदल केला असून काही कर्मचाऱयांवर जबाबदाऱया वाढविण्यात आल्या असून काहींना अन्य वॉर्डची जबाबदारी दिली आहे.
महसूल निरीक्षक, बिल कलेक्टर आणि वॉर्ड क्लार्कचा समावेश असून काही संगणक ऑपरेटरांच्या जबाबदाऱयांमध्ये बदल केला आहे. पहिल्या टप्प्यात सात कर्मचाऱयांच्या बदलीचा आदेश आयुक्तांनी बजावला होता. पण दुसऱया दिवशी 40 हून अधिक कर्मचाऱयांच्या बदलीची यादी तयार करून शुक्रवारी याबाबतची नोटीस कर्मचाऱयांना बजावली आहे. अचानक इतक्मया कर्मचाऱयांच्या बदल्यांचा निर्णय महापालिकेत पहिल्यांदाच घेण्यात आला आहे.
यापूर्वी तत्कालीन आयुक्त अशोक दुडगंटी यांनी 57 कर्मचाऱयांच्या बदलीची यादी तयार करून याबाबतचा आदेश बजावला होता. पण अशोक दुडगुंटी यांची बदली झाल्याने कर्मचाऱयांच्या बदलीचा प्रस्ताव स्थगित केला होता. पण त्यानंतर काही मोजक्मयाच कर्मचाऱयांच्या जबाबदाऱयामध्ये बदल केला होता. आता 50 कर्मचाऱयांच्या अंतर्गत बदल्या केल्या असून तातडीने रूजू होण्याचा आदेश आयुक्तांनी बजावला आहे.
मनपा आयुक्तांच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱयांना चांगलाच धक्का बसला आहे. कार्यालयात विविध विभागात काम करणाऱया कर्मचाऱयांना त्यांच्या जबाबदाऱयांची माहिती घेण्यास वेळ लागण्याची शक्मयता आहे. कार्यालयातील कारभार सुधारण्यासाठी कर्मचाऱयांच्या जबाबदाऱयांमध्ये बदल केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.