- महसूल कार्यालयात येणाऱया अभ्यागतांना कोरोना टेस्ट करून येणे बंधनकारक करावे
- महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाऱयाकडे केली मागणी
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोविडच्या संकटात काम करणाऱया महसूल अधिकारी व कर्मचाऱयांना व त्यांच्या कुटुंबासाठी सर्व रुग्णालयामध्ये 10 टक्के बेड राखीव ठेवावेत तसेच महसूल कार्यालयात येणाऱया अभ्यांगताना कोरोना टेस्ट करून येणे बंधनकारक करावे, अशी मागणी महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याजवळ केली आहे.
महाराष्ì^ राज्य महसूल अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सत्यवान माळवे, कोषाध्यक्ष शाम लाखे, मुख्यालय अध्यक्ष अशोक पोळ, प्रसिद्धी प्रमुख स्?वप्निल प्रभू, दीपक परब आदी पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
कोविड-19 चा प्रार्दुभाव विचारात घेता कोविड-19 शी लढा देणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच शासन यंत्रणेला सहाय्य करणाऱया घटाकांचे व त्यांचे कुटुंबियांचे मनोबल खंबीर रहावे याकरिता अधिकारी, कर्मचारी यांना कोविड-19 ची बाधा झालेल्या जिल्हय़ामधील रुग्णालयामध्³ाs उपलब्ध खाटांपैकी 10 टक्के खाटा कोविड योध्?दे व त्यांचे कुटुंबीय यांचेकरिता प्राधान्यक्रमाने उपलब्ध ठेवावेत.
अभ्यांगताचे प्रवेशाबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा. प्राधान्याने अती महत्वाच्या कामासाठीच कार्यालयामध्³ाs येणाऱया अभ्यांगतांसाठी RTPCR टेस्ì निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक करावे, तसेच यावेळी महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने नागरिकांना अत्यंत महत्वाच्या कामाकरिताच कार्यालयामध्³ाs येणेबाबत तसेच स्?वत:ची काळजी घेणेबाबत संघटनेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे, असे सांगितले. तसेच महसूल कर्मचाऱयांच्या विविध समस्यांकडेही लक्ष वेधण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आपण कर्मचाऱयांच्या मागण्या व विविध प्रश्नांवर जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.