प्रतिनिधी / सोलापूर
प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुन्ना बज्जर या वाहनचालक महसूल कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केल्या प्रकरणी आज गुरुवारी दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना शाखा सोलापूर यांच्यावतीने एक हजार कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केले आहे. दोषींना तात्काळ अटक न केल्यास अन्यथा बेमुदत कामबंद आंदोलन करु असा इशारा ही निवेदनात दिला.
निवेदनात असे म्हटले आहे की, मंगळवारी पंढरपूर येथील मुलाणी हे शेतकरी त्यांनी दिलेल्या अवैध सावकारी बंद करून संबंधितावर कारवाई करण्यासाठी दिलेल्या संबंधित कार्यकारी करावी होत नसल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होते. शेतकऱ्यास आत्महत्या करण्यास परावृत्त करण्याचे प्रयत्न वाहनचालक कंत्राटी कर्मचारी हे करीत असताना प्रहार संघटनेच्यावतीने अरेरावी करून मारहाण करण्यात आलेली आहे.
दरम्यान या घटनेचा निषेध करीत पहिल्या दिवशी काळ्या फिती लावून निदर्शने केले तर आज लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. त्यामुळे तात्काळ आरोपींवर कडक कारवाई करून अटक करावी, अन्यथा जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने बेमुदत काम बंद स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही आंदोलनाला दिला आहे.