दोडामार्ग/वार्ताहर-
दोडामार्ग तालुका महसूल विभाग अंतर्गतच्या तळकटचे मंडळ अधिकारी राजन विठ्ठल गवस यांचा नुकताच सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ओरोस येथे सत्कार झाला. महसूल दिनी आयोजित कार्यक्रमात श्री. गवस यांचा कुशल अधिकारी म्हणून सत्कार झाला. त्याचबरोबर दोडामार्ग तहसील कार्यालयातील सहाय्यक लिपिक परमेश्वर गवळी व चालक मारुती ओंबासे यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी व तहसीलदार रोहिणी रजपूत अन्य अधिकारीही उपस्थित होते.