प्रतिनिधी /बेळगाव
जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून विधान परिषदेतील भाजपचे मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ यांनी कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयाला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविण्यासोबतच त्यांनी टपाल कार्यालयातील कर्मचाऱयांशी संवाद साधला. पोस्टमन घरी येऊन पोस्टकार्ड द्यायचा, या लहानपणीच्या आठवणी त्यांनी ताज्या केल्या.
यावेळी पोस्टमास्तर केरीमठ, साहाय्यक पोस्टमास्तर किनरीमठ, फिलाटली क्लबचे धर्मेंद्र जाई, किशोर देशपांडे, रवी पाटील, श्रीनिवास चव्हाण, मंजुनाथ अंगडी यांच्यासह पोस्ट कर्मचारी उपस्थित होते. कर्मचारीवर्गाच्यावतीने कवटगीमठ यांचा सत्कार करण्यात आला.