ऑनलाईन टीम / मुंबई :
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी महिनाभरात 5 ते 10 कोटींचे कपडे वापरले आहेत. वानखेडे कधीही त्यांचे कपडे रिपीट करत नाहीत. ते 70 हजारांचा शर्ट, लाखाची पॅन्ट, दोन लाखांचे बेल्ट, लाखांचे बूट वापरतात, असा दावा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्याला समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
वानखेडे म्हणाले, माझ्या महागडय़ा कपडय़ांची केवळ अफवा आहे. मलिक यांनी लोखंडवाला मार्केटमध्ये जाऊन तेथे कपडय़ांचे दर माहिती करुन घ्यावेत. त्यांनी खरी माहिती शोधून काढावी, असे वानखेडे यांनी म्हटले आहे.
तर समीर वानखेडे यांच्या बहिण जास्मिन वानखेडे यांनीही मलिकांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. आपल्या आईने दोन्ही मुलांना महागडी घडय़ाळे दिली होती. तसेच समीर हे वर्षातून एकदाच कपडे खरेदी करतात. नवाब मलिकांनी केलेले आरोप चुकीचे आहेत, असे जास्मिन यांनी म्हटले आहे.