ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत सलग नवव्या दिवशी वाढ झाली असूनसोमवारी पेट्रोल किंमत प्रति लिटर 83.17 रुपये आणि डिझेलची किंमत 73.21 रुपये इतकी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलकत्ता, दिल्ली आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत अनुक्रमे 78.10, 76.26 आणि 79. 96 रुपये झाली आहे . तर डिझेलच्या किंमतीत देखील वाढ झाल्याने या महानगरांना आता अनुक्रमे 70.33, 74.64 आणि 72. 69 रुपये मोजावे लागणार आहेत.
कोरोना व्हायरस आणि लॉक डाऊन मुळे देशात सलग 82 दिवस स्थिर होते. मात्र, मागील नऊ दिवस दररोज सकाळी 6.30 वाजता दरात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सामान्य जनतेला त्याचा महागाईची झळ सोसावी लागत आहे.