ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात अनेक ठिकाणी पेट्रोल – डिझेलच्या दराने 100 गाठली आहे. तर दुसरीकडे एलपीजी सिलेंडरच्या दरात सरकारने आज पुन्हा एकदा वाढ केली आहे. महिन्याभरातील ही तिसरी वाढ आहे. आतापर्यंत 21 दिवसांत 100 रुपयांची वाढ झाली आहे.
त्यामुळे आता विना अनुदानित एलपीजीचा 14.2 किलोचा सिलेंडर 25 रुपयांनी महाग झाला आहे. त्यामुळे दिल्लीत 769 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता 794 रुपयांना मिळणार आहे. इतका झाला आहे. 25 फेब्रुवारीपासून हे नवीन दर लागू झाले आहेत.
तर, कोलकाता मध्ये 795 वरून 820 रुपये, चेन्नईत 735 आणि मुंबईत 469 रुपयांना मिळणाऱ्या सिलेंडरची किंमत आता 794 रुपये झाली आहे. तर चेन्नईत 785 मध्ये मिळणार सिलेंडर 810 रुपये इतका झाला आहे.