साधे पेट्रोल उपलब्ध नसल्याचे कारण : वाहनचालकांना आर्थिक फटका
प्रतिनिधी /बेळगाव
महागाईमुळे सर्वसामान्य भरडले जात असताना आता पॉवर पेट्रोलच्या सक्तीमुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ‘साधे पेट्रोल नाही, हवे तर पॉवर पेट्रोल भरा’, असे पेट्रोलपंपांवर सांगण्यात येते. गरजेला अधिक पैसे मोजत पॉवर पेट्रोल खरेदी करण्याची वेळ आली आहे. यामुळे वाहनचालकांना नाहक आर्थिक फटका बसत आहे. पेट्रोलपंप चालकांच्या मनमानी कारभाराला चाप बसविणे गरजेचे आहे.
सध्या पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल प्रतिलिटर 110 वर पोहोचल्याने वाहने बाहेर काढताना विचार करावा लागत आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्चावर परिणाम झाला आहे. पेट्रोल वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशी परिस्थिती एकीकडे असताना दुसरीकडे मात्र पॉवर पेट्रोलमुळे अधिक पैसे खर्च करावे लागत आहेत.
बऱयाचवेळा पेट्रोलपंपांवर साधे पेट्रोल नसल्याचे सांगण्यात येते. पॉवर पेट्रोल साध्या पेट्रोलपेक्षा प्रतिलिटर 3 ते 4 रुपयांनी महाग असल्याने आर्थिक फटका बसत आहे. दोन ते अडीच लिटर पेट्रोल घातल्यास 10 रुपये अधिक मोजावे लागतात. ज्या वाहनांमध्ये पेट्रोल अत्यंत कमी आहे, त्यांना नाईलाजास्तव पेट्रोल भरून घ्यावे लागते. अन्यथा पुढील पेट्रोलपंप शोधत जावे लागते. शहर तसेच तालुक्मयातील बऱयाचशा पेट्रोलपंपांवर अशीच परिस्थिती असल्यामुळे वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
अधिकाऱयांनी चाप लावण्याची गरज
शहरातील काही मोजक्मया पेट्रोलपंपांवर असे प्रकार घडत आहेत. पेट्रोल भरताना चालाखी करत काटामारी केली जाते, हे प्रत्येक वाहन चालकाने कधी ना कधी अनुभवलेले असतेच. त्यातच आता साधे पेट्रोल नसल्याचे कारण देऊन नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. खरेच साधे पेट्रोल संपलेले असते की, टार्गेट पूर्ण करण्यासाठी हे कारण देण्यात येते, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावर पेट्रोल कंपन्यांच्या अधिकाऱयांनी चाप लावणे गरजेचे आहे.
पेट्रोल-डिझेल दर
साधे पेट्रोल | 110 रुपये |
पॉवर पेट्रोल | 114.14 |
डिझेल | 93.79 |