सावंतवाडी/ प्रतिनिधी-
गॅस, पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या दरवाढीविरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ सावंतवाडी येथे काँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. मोदी सरकार हाय हाय च्या घोषणा देण्यात आल्या. सावंतवाडी तहसीलदार कार्यालय जवळ महागाई विरोधातील निषेध मोर्चासाठी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शहराध्यक्ष एडवोकेट राघवेंद्र नार्वेकर, एडवोकेट दिलीप नार्वेकर, एडवोकेट संभाजी सावंत, विभावरी सुकी, साक्षी वंजारी, अमिदी मिस्त्री, माया चिटणीस, स्मिता वागळे, कौस्तुभ गावडे, जस्मिन, लक्ष्मी स्वार, सचिन बुगडे, मुसिन शेख, बबन डिसूजा, आनंद कुंभार, अभय मालवणकर आदी उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचा विजय असो, राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाही देण्यात आल्या. तसेच या मोर्चात गॅस सिलेंडरला हार घालून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. वाढती महागाई यामुळे सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा देण्यात आल्या