जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी
प्रतिनिधी /बेळगाव
देशामध्ये महागाईने कहर केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता विविध अडचणींना तोंड देत आहे. याचबरोबर भाजप जातीय राजकारण करत असल्याचा आरोप करत मुस्लीम बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
पेट्रोल, गॅस, डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. तेंव्हा तातडीने महागाई कमी करावी, अशी मागणी करण्यात आली.
याचबरोबर भाजप जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. तेंव्हा आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.