सावंतवाडी/ प्रतिनिधी-
महाड येथे झालेल्या पूरस्थिती तील पूरग्रस्तांना सावंतवाडी शहरातील तरुणांनी एकत्र येत त्यांना मदतीचा हात दिला आहे. सावंतवाडी येथील प्रसिद्ध खानावळधारक राजू भालेकर व दिलीप वाडकर या दोघांनी ब्रीजिंग पर्सनॅलिटी व मुंबई हेल्थ डॉट कॉम यांना सहकार्य करत ब्रिजेश तळवडेकर यांच्या माध्यमातून जवळपास महाडी तील पूरग्रस्तांना चहा, कॉपी, तांदूळ आदी जीवनावश्यक वस्तू घरपोच दिले आहेत.
सावंतवाडी शहरात हे जीवनाश्यक वस्तू चे सामान गोळा करून ते साईकृपा ट्रॅव्हल्स ने महाड येथे मोफत लिहून देण्याची व्यवस्था केली आहे . साईकृपा ट्रॅव्हल्स चे विजय सावंत व राजेश कारेकर यांनीही महाड येथे जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यास सहकार्य केले. ब्रीजिंग पर्सनॅलिटी मुंबई हेल्थ डॉट कॉम सामाजिक भावनेतून काम करत आहे. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ब्रीजिंग पर्सनॅलिटी च्या माध्यमातून गावागावात शैक्षणिक जनजागृती केली जात आहे. त्या अनुषंगाने ब्रिजेस तळवडेकर यांनी महा ड येथे पूरग्रस्तांना मदत कार्य करण्याचा संकल्प केला. या संकल्पना राजू भालेकर, दिलीप वाडकर यांनी सहकार्य करत सावंतवाडी शहरातील नागरिकांना आव्हान केले. त्यानुसार मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या.. त्या साई कृपा ट्रॅव्हल्स च्या माध्यमातून त्या महाड येथे घरपोच देण्यात आले आहेत. या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.