प्रतिनिधी/ महाड
महाड एसटी आगारामध्ये शनिवारी सकाळी एका कर्मचाऱयाने झाडाला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने सोडवण्यात आले आणि त्याचा जीव वाचवला. या बाबत महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये माहिती देण्यात आली.
संदीप तावरे (35) असे त्या एसटी चालकाचे नाव आहे. महाराष्ट्रात एसटी महामंडळ कर्मचाऱयांनी त्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे महाड आगारांतून एसटीच्या सर्व फेऱया बंद आहेत. संप अद्याप सुरु असल्याने राज्य शासन आणि कर्मचारी यांच्यामध्ये बोलणी यशस्वी होत नसल्याने राज्यांमध्ये संप सुरुच आहे. तसेच कर्मचाऱयांच्या आत्महत्याच्या घटना घडत आहेत. शनिवारी सकाळी 8 च्या सुमारास चालक संदीप तावरे याने आगाराच्या इमारतीवर चढून भिंतीलगत असलेल्या झाडाच्या फांदीला उपरणे बांधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना जवळ असलेल्या सुरक्षारक्षाकाच्या निदर्शनाला आल्यानंतर त्याने तावरेला झाडापासून दूर करुन वाचवले. महाड आगाराचे प्रभारी प्रमुख शिवाजी जाधव यांनी त्वरित या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्याप्रमाणे शहर पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली असता त्याने घरातील वादातून आत्महत्या करण्याचे पाऊल उचलल्याचे आगारप्रमुख शिवाजी जाधव यांनी सांगितले.