ऑनलाईन टीम / केपटाउन :
महात्मा गांधींचे पणतू सतिश धुपेलिया यांचे दक्षिण आफ्रिकेत कोरोनाने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. धुपेलिया यांची बहीण उमा मेस्थरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे.
धुपेलिया यांना न्युमोनिया झाला होता. त्यांच्यावर मागील महिनाभरापासून केपटाउनमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
गांधीजींचे चिरंजीव मणिलाल गांधी हे दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास होते. धुपेलिया हे मणिलाल यांचे नातू होते. त्यांनी मीडियात व्हिडीओग्राफर आणि फोटोग्राफर म्हणून काम केले आहे. दरबनजवळील गांधी विकास ट्रस्टच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.