पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत होणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
महा विकास आघाडीच्या सरकारने महाराष्ट्रातील सर्वच आर्थिक स्तरातील नागरिकांसाठी नव्याने विस्तारीत महात्मा फुले जीवनदायी आरोग्य लागू केली आहे. सर्वच म्हणजे केशरी रेशनकार्ड धारकासह अगदी पांढऱ्या रेशन कार्डधारकांनासुद्धा पाच लाखापर्यंतचे उपचार यामध्ये मोफत मिळणार आहेत. यात कोल्हापुरातील ४४ दवाखान्यांचा समावेश करण्यात आला आहे.
कारण या योजनेच्या माध्यमातून अगदी छोट्या-छोट्या आजार विकारापासून ते मोठमोठ्या आजार व विकारांपर्यंत अगदी सरकारी दवाखान्यामधून मिळणारे उपचार सुद्धा खासगी दवाखान्यातूनही मिळणार आहेत. युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या सहयोगातून राज्यांमध्ये सुरू झालेली ही योजना पंधराशे कोटींची असल्याची माहिती ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. कॅशलेशच्या रूपात महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाआघाडी सरकार कार्यरत होते, त्यावेळी राजीव गांधी जीवनदायी योजना कार्यरत होती. गेल्या सरकारने या योजनेचे नामकरण महात्मा फुले जीवनदायी योजना असं केलं. त्याच नावाने या योजनेचा आता पुन्हा विस्तार केलेला आहे. सर्वच आजार समाविष्ट असलेल्या या नव्या आणि विस्तारित योजनेचा फायदा राज्यातील सर्वच नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.
योजनेअंतर्गत विविध आजारांवरील सरकार आणि इन्शुरन्स कंपनीने ठरवलेले दर आहेत, त्यानुसारच आकारणी करावी. गोरगरिबांची आणि विशेषता रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा याच भावनेने ही सेवा करावी.
रुग्णसेवेत खंड पडल्याचे दुःख…….
कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन व संचारबंदीमुळे गेली पंधरा वीस वर्ष सुरू असलेली नियमित रुग्णसेवा मी करू शकलो नाही. याबद्दल जिल्ह्यातील जनतेची आणि समस्त रुग्णांची मी माफी मागतो अशी खंत मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे
ज्या रुग्णांना ताप, सर्दी, खोकला किंवा कोरोनाची लक्षणे आहेत ते रुग्ण सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जातील. बाकीच्या सर्व आजारांवर डॉक्टरानी कुणालाही सेवा नाकारू नये. या योजनेअंतर्गत सर्व ते उपचार करावेत असे आवाहन ही मुश्रीफ यांनी केले आहे
महात्मा फुले जीवनदायी योजनेत समाविष्ट कोल्हापूर जिल्ह्यातील हॉस्पिटल्सची नावे
कोल्हापूर शहर:
ॲपल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,
कॉन्टॅकेअर आय हॉस्पिटल,
डायमंड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल,
डॉ .डी .वाय .पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट,
जोशी हॉस्पिटल अँड डायलिसिस सेंटर,
कोल्हापूर कॅन्सर सेंटर,
केपीसी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल प्रा. लि.,
कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक्स अँड ट्रामा -केआयओटी,
मगदूम इंडो सर्जरी इन्स्टिट्यूट,
मसाई हॉस्पिटल,
राजर्षी छत्रपती शाहू मेडिकल कॉलेज अँड सीपीआर हॉस्पिटल,
सावित्रीबाई फुले हॉस्पिटल,
सिद्धिविनायक नर्सिंग होम,
सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर,
सिद्धिविनायक हार्ट फाउंडेशन,
सनराइज् हॉस्पिटल,
स्वस्तिक हॉस्पिटल,
टूलिप हॉस्पिटल,
वारणा इन्स्टिट्यूट ऑफ युरो सर्जरी,
ओम साई ओंको सर्जरी हॉस्पिटल,
गांधिनगर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय ,
सेवा रुग्णालय.
जिल्ह्यातील इतर दवाखान्याची नावे अशी:
इचलकरजी-
अलायन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,
निरामय हॉस्पिटल,
इंदिरा गांधी स्मृती -आयजीएम हॉस्पिटल,
जयसिंगपूर-
माने केअर हॉस्पिटल,
हिरेमठ हॉस्पिटल,
संजीवनी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल,
गडहिंग्लज-
कै. केदारी रेडेकर हॉस्पिटल,
देसाई हॉस्पिटल,
गडहिंग्लज उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय,
संत गजानन महाराज हॉस्पिटल -महागाव.
गिरीजा हॉस्पिटल -पेठ वडगाव,
रुदया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हेरले,
रामकृष्ण चरीटेबल ट्रस्ट दवाखाना- घोटवडे,
शतायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर- शिरोळ,
यशवंत धर्मार्थ रुग्णालय -कोडोली,
सद्गुरू बाळुमामा ट्रस्ट हॉस्पिटल- आदमापूर,
कुडाळकर हॉस्पिटल -पेठ वडगाव,
राधानगरी ग्रामीण रुग्णालय,
कोडोली उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय,
संजीवन हॉस्पिटल एंड क्रिटिकल केअर युनिट -पन्हाळा