1 लाख 3 हजार 440 रुपये जप्त : नऊ जणांना अटक
प्रतिनिधी /बेळगाव
महाद्वाररोड येथे पाचव्या क्रॉसजवळ जुगारी अड्डय़ावर धाड टाकून 9 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 1 लाख 3 हजार 440 रुपये व इतर साहित्य जप्त करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू होते.
महाद्वाररोड येथे जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर एसीपी सदाशिव कट्टीमनी व मार्केटचे सीपीआय मल्लिकार्जुन तुळसीगिरी यांनी आपल्या सहकाऱयांसह मंगळवारी रात्री धाड टाकली. यावेळी जुगार खेळणाऱया 9 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळील 1 लाख 3 हजार 440 रुपये जप्त करण्यात आले. जुगार अड्डय़ांवर कारवाईसाठी आता पोलिसांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे.