मनपा आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांचा कानाडोळा
प्रतिनिधी /बेळगाव
महाद्वार रोड परिसरात डेनेज वाहिनी तुंबल्याने रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विठृल-रखुमाई मंदिराशेजारी सांडपाणी साचल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. परिसरात विहिरी आणि कूपनलिका असल्याने पाझरून पाणी दूषित होण्याचा धोका आहे. याबाबत सातत्याने तक्रार करूनदेखील कानाडोळा करण्यात आल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
महाद्वार रोड परिसरातील डेनेज चेंबर तुंबल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. परिणामी परिसरातील चेंबर आणि गटारीमधून सांडपाणी वाहत आहे. गेल्या तीन महिन्यापासून ही समस्या निर्माण झाली असून, रहिवाशांना नाहक त्रास होत आहे. तसेच जवळच मंदिर व पाण्याची टाकी असल्याने नागरिकांची गर्दी असते. दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. डेनेज चेंबरच्या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला असून लहान मुले पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच परिसरातील विहिरी व कूपनलिकांचे पाणी दूषित झाले आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रारी करूनही याची दखल घेण्यात आली नाही. मनपाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी याकडे कानाडोळा केला आहे. डेनेज समस्येमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. तक्रारी व पाहणी करण्यात वेळ घालवण्याऐवजी समस्येचे निवारण करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होत असून समस्येचे निवारण न झाल्यास रास्ता रोको करू, असा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.