प्रतिनिधी/ बेळगाव
महानगरपालिकेतर्फे पौरकार्मिक दिनानिमित्त कामगारांच्या उपस्थितीत केक कापून हा दिवस साजरा करण्यात आला. महानगरपालिकेच्या कर्मचाऱयांच्यावतीने निरीक्षक कलावती, शिल्पा कुंभार व वॉर्ड क्रमांक 21 चे सुपरवायझर संजय पाटील यांनी वॉर्ड स्वच्छ व सुंदर करून उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.