नवी दिल्ली : नवी दिल्लीस्थित ग्रीनटेक फौंडेशनच्यावतीने दिला जाणारा ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर अवॉर्ड-2021 हा पुरस्कार महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांना जाहीर झाला आहे. 27 ऑगस्ट रोजी जम्मू आणि काश्मीर येथील सोनमर्गमध्ये आयोजित ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर परिषदेमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महापारेषण कंपनीने राबविलेल्या अभिनव उपक्रमांकरिता तसेच कंपनीच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. 1994 बॅचचे आयएएस असलेले दिनेश वाघमारे बीई इलेक्ट्रॉनिक्सचे पदवीधर असून त्यांनी आयआयटी खरगपूर येथून एम.टेक केले आहे. जानेवारी 2020 मध्ये त्यांनी महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांना या क्षेत्रातील प्रशासनाचा 27 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे.
Previous Articleप्रजेला राजा मानणारा युगपुरुष
Next Article 248 आसनी विमानातून एकटय़ाने प्रवास
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.