कोनवाळ गल्ली येथील उपविभागीय कार्यालय दोन दिवसांसाठी सीलडाऊन
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात कोरोना विषाणूचा प्रसार झपाटय़ाने वाढला आहे. महापालिका कार्यालयातील कर्मचाऱयाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे खळबळ माजली असून कोनवाळ गल्ली येथील उपविभागीय कार्यालय 48 तासांसाठी सीलडाऊन करण्यात आले. कर्मचाऱयांच्या संपर्कात आलेल्या 12 कर्मचाऱयांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
शहरात येणाऱया नागरिकांना आणि कोरोना रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात येते. या नागरिकांवर नजर ठेवण्याची जबाबदारी महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱयांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आता महापालिका कार्यालयातील कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा रुग्णालयातील नर्स, डॉक्टर, पोलीस दलातील कर्मचाऱयांपाठोपाठ आता महापालिकेतील कर्मचाऱयालाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना थोपविण्यासाठी आरोग्य, पोलीस आणि महापालिका कार्यालयातील कर्मचारी सातत्याने परिश्रम घेत आहेत. आता याच कर्मचाऱयांना कोरोनाची लागण होत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
कोरोनाची लागण झालेला कर्मचारी कोनवाळ गल्ली येथील उपविभागीय कार्यालयातील असून त्याच्या संपर्कात असलेल्या 12 कर्मचाऱयांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच कोनवाळ गल्ली कार्यालयाला सॅनिटायझर करून सीलडाऊन करण्यात आले असून सदर कार्यालयातील कामकाज दोन दिवस बंद ठेवण्यात आले आहे. या परिसरात असलेली अंगणवाडी शाळा बंद करण्यात आली आहे. शाळेतील शिक्षकांना, अंगणवाडी कार्यकर्त्यांनाही न येण्याची सूचना करण्यात आली आहे. कार्यालयाच्या मागील बाजूस वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱयांचे अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. मनपा कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने अधिकारी व कर्मचाऱयांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
मनपा कर्मचाऱयांमध्ये धास्ती
परराज्यांतून येणाऱया नागरिकांना होम क्वारंटाईन करून त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत आहे. सध्या परराज्यांतून दीड हजारहून अधिक नागरिक शहरात दाखल झाले आहेत. बेंगळूर शहरासह राज्यातील विविध जिल्हय़ांतून नागरिक बेळगावात आले आहेत. त्यांनाही होम क्वारंटाईन केले आहे. त्यांच्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी मनपा कर्मचाऱयांवर असल्याने कोरोनाची लागण होण्याची शक्मयता दाट आहे. त्यामुळे मनपा कर्मचाऱयांमध्ये आता धास्ती निर्माण झाली आहे. शहरात सर्वत्र फिरून कर्मचारी मनपा कार्यालयात येत असतात. त्यामुळे मुख्य कार्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये बुधवारी सकाळी सॅनिटायझर करण्यात आले.