सांगली / प्रतिनिधी
सांगली, मिरज व कुपवाड शहरातील आरक्षीत सर्व भुखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी नगररचना विभागाला दिले आहेत. येत्या सात दिवसात सर्व आरक्षणाना नोटीस काढावी. त्यांना टी डी आर, एफ एस आय तसेच एआरसह सर्व पर्याय उपलब्ध करून घ्यावेत, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
महापालिकेची ऑनलाईन सभा बुधवारी पार पडली.
महापौर गीता सुतार अध्यक्षस्थानी होत्या. सभेत कुपवाड येथील एका भुखंडावरील आरक्षण उठवण्याच्या विषयावर जोरदार चर्चा झाली. यावेळी कॉग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील यांनी आरक्षीत सर्वच भुखंड महपाालिकेने ताब्यात घेण्याची कायदेशीर प्रक्रिया राबवावी अशी महत्वपूर्ण सुचना केली होती. यावर महापौर गीता सुतार यांनी याबाबत आयुक्त नितीन कापडणीस यांना आदेश देत महापालिका क्षेत्रातील सर्व आरक्षीत भुखंड ताब्यात घेण्यास सांगीतले होते. त्यानुसार आयुक्त कापडणीस यांनी येत्या सात दिवसात नगर रचना विभागाने आरक्षीत सर्व भुखंडांच्या मालकांना नोटीसा बजावाव्यात व आरक्षीत जागा ताब्यात घेण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरु करावी असे आदेश दिले आहेत.