प्रतिनिधी / कोल्हापूर
महापुरामुळे कृषिपंपाचे खराब झालेले ट्रान्सफॉर्मर, कोसळलेले आणि वाकलेले विद्युत खांब, तुटलेल्या विद्युत वाहक तारांची प्राधान्याने दुरुस्ती करुन वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अशा मागणीचे निवेदन इरिगेशन फेडरेशनच्यावतीने महावितरणचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे यांना सोमवारी दिले.
निवेदनामध्ये म्हटले आहे, महापूरामध्ये सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे ट्रान्सफॉर्मर, विद्युत मोटारी व इलेक्ट्रीक साहित्य यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. 2019 च्या महापुरात नुकसान झालेल्या सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे विद्युत मोटर, ट्रान्सफॉर्मर व इतर इलेक्ट्रिक साहित्याचे नुकसान झालेले होते. सहकारी पाणी पुरवठा संस्थांनी स्वतः कर्ज काढून स्वखर्चाने सदर साहित्यांची दुरुस्ती केली होती. पुन्हा 2021 च्या महापुराने इलेक्ट्रिक साहित्यांचे अपरिमीत नुकसान झाले आहे. सलग आलेल्या संकटामुळे सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे आर्थिक गणित विस्कटले आहे. तेव्हा महावितरण कंपनीने सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे ट्रॉन्सफॉर्मर तात्काळ दुरुस्ती करुन द्यावेत. वीज बिलाची थकबाकी भरण्यासाठी आडवणूक करु नये. वीज बिल भरण्यासाठी काही अवधी द्यावा. कारण पाणी पुरवठा संस्था चालू होऊन शेतकऱयांच्या शेतात पाणी गेल्याशिवाय शेतकरी पैसे भरणार नाहीत. यामध्ये दिरंगाई झाल्यास शेतकऱयांना पाणी देण्यास अवधी लागणार असून त्याचा फटका शेतीपिकांना बसणार आहे.
राज्य शासनाने महापुरामध्ये बाधीत झालेल्या सहकारी पाणी पुरवठा संस्थांचा कोणत्याही अटीशिवाय वीज पुरवठा जोडण्याचे जाहीर केले होते. शिवाय थकबाकीसाठी कोणत्याही सहकारी पाणी पुरवठा संस्थांचा वीज पुरवठा खंडीत न करण्याचे अश्वासन दिलेले आहे. याची नोंद घेऊन महावितरण कंपनीने कोल्हापूर व सांगली जिह्यातील पाणी पुरवठा संस्थांचा वीज पुरवठा जोडून ट्रान्सफॉर्मर जोडून द्यावेत, अशी इरिगेशन फेडरेशनने केली.
यावेळी कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील- किणीकर, कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील-पाडळीकर, उपाध्यक्ष सुभाष शहापुरे, सदस्य संजय पाटील- खुपीरकर, आर के पाटील, सागर पाटील, सचिव मारुती पाटील, महादेव सुतार, बाबुराव पाटील तसेच सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे पदाधिकारी मोठÎा संख्येने उपस्थित होते.
1 रूपये 16 पैसे दरानेच वीज बिलाचा भरणा करण्यास मान्यता
यावेळी अंकुर कावळे यांनी सहकारी पाणी पुरवठा संस्थांची 1 रुपये 16 पैसे दराने वीज बिले भरून घेण्याचे मान्य केले. तसेच पाणी पुरवठा संस्थांचा वीजपुरवठा प्राधान्याने सुरू करून ट्रांसफॉर्मर वेळेत बसवून देण्याची ग्वाही दिली.