चर्चांना पुन्हा जोर वाढला : महानगरपालिकेत स्वच्छता मोहीम
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊन बरेच महिने उलटले तरी अद्याप महापौर-उपमहापौर निवडीचे घोंगडे भिजत पडले होते. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ही निवड होईल, अशी शक्मयता वर्तविली जात होती. बुधवारी महानगरपालिकेत स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आल्याने लवकरच महापौरपदावर शिक्कामोर्तब होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
महानगरपालिकेची निवडणूक होऊन चार महिने झाले तरी महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्यात आली नव्हती. नगरविकासमंत्र्यांनी जानेवारीच्या दुसऱया आठवडय़ात निवडणूक होईल, असे सांगितले होते. परंतु त्यांनी दिलेली डेडलाईनही होऊन गेली. निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळूनदेखील महापौर निवडीचा प्रश्न भिजत पडला आहे. याचा परिणाम बेळगाव शहराच्या विकासकामांवर होत असल्याने ही निवडणूक लवकर पूर्ण करून कौन्सिल अस्तित्वात यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
एकीकडे महापौर-उपमहापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना दुसरीकडे बुधवारपासून महानगरपालिकेतील स्वच्छता सुरू करण्यात आली. स्वच्छता करण्यात येत असल्याने महापौर निवडीच्या चर्चांना पालिकेमध्ये पुन्हा एकदा जोर चढला. महापौर व उपमहापौरपदावर कोणाची वर्णी लागणार? या दोन्ही पदांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याने येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.