प्रादेशिक आयुक्त तारीख निश्चित करणार
प्रतिनिधी /बेळगाव
महापौर-उपमहापौर आरक्षणाचा मुद्दा स्पष्ट झाला असून महापौरपद सामान्य महिला आणि उपमहापौरपद मागास-ब महिलेकरिता राखीव आहे. त्यामुळे निवडणूक घेण्याच्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया होणार असल्याने याबाबतचे पत्र प्रादेशिक आयुक्तांना देण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापालिका निवडणूक होवून पाच महिने झाले. पण महापौर-उपमहापौर निवड झाली नसल्याने सभागृह अस्तित्वात आले नाही. महापौर-उपमहापौर निवडणूक कोणत्या आरक्षणानुसार घ्यायची, असा मुद्दा उपस्थित झाल्याने ही निवड प्रक्रिया रखडली होती. मात्र नगरविकास खात्याने अलिकडेच याबाबत स्पष्टीकरण दिले असून 21 व्या कार्यकालावधीसाठी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार महापौर-उपमहापौर निवड करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने निवडणूक घेण्याच्या दृष्टीने हालचाली चालविल्या आहेत.
प्रशासकपदाचा कार्यभार प्रादेशिक आयुक्तांकडे सोपविण्याची तरतूद महापालिका कायद्यात आहे. तसेच महापौर-उपमहापौर निवडणूक प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली घेण्याचे महापालिकेच्या कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र नगरविकास खात्याने प्रशासकपदाची जबाबदारी जिल्हाधिकाऱयांकडे सोपविली आहे. प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी असले तरी महापौर-उपमहापौर निवड ही प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
त्यामुळे महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्यासाठी प्रादेशिक आयुक्तांना महापालिकेच्यावतीने आवश्यक माहिती सादर करण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र तयार करण्यात आले आहे. मात्र महापालिका आयुक्त रुदेश घाळी हे कोरोनाबाधित असल्याने कामकाज रखडले आहे. महापालिका आयुक्त रूजू झाल्यानंतर प्रादेशिक आयुक्तांना पत्र पाठवून महापौर-उपमहापौर निवडणुकीची तारीख घेण्यात येणार आहे. महापौर-उपमहापौर निवडीची तारीख प्रादेशिक आयुक्त निश्चित करणार आहेत. निवडणुकीच्या सात दिवस आधी नोटीस जारी करणे बंधनकारक आहे. सोमवारनंतरच महापौर-उपमहापौर निवड प्रक्रियेला वेग येण्याची शक्मयता आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱया किंवा तिसऱया आठवडय़ात महापौर-उपमहापौर निवडणूक होण्याची शक्मयता आहे.