शहरात चर्चेला ऊत, तारीख निश्चित नसल्याची मनपाची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
महापौर, उपमहापौर निवडणूक कोणत्या वषीच्या आरक्षणानुसार घ्यायची याबाबतचे स्पष्टीकरण शासनाकडून करण्यात आलेले नाही. मात्र जानेवारीच्या दुसऱया आठवडय़ात निवडणूक होणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु याबाबत महापालिकेला अधिकृत पत्र किंवा शासनाकडून कोणतीच सूचना आली नसल्याचे सांगण्यात आले.
महापालिका निवडणुका होऊन चार महिने झाले मात्र अद्याप महापौर-उपमहापौर निवडणूक झालेली नाही. जानेवारीच्या दुसऱया आठवडय़ात निवडणूक घेतली जाईल, अशी माहिती नगरविकास मंत्र्यांनी दिली होती. त्यामुळे जानेवारी 12 ते 15 या दरम्यान निवडणुकीची घोषणा होईल, अशी चर्चा सुरू आहे. दि. 12 रोजी महापौर, उपमहापौर निवड होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. पण महापौर, उपमहापौर आरक्षणाचा वाद प्रलंबित असताना निवड कशी होणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. दि. 12 रोजी निवडणूक घेण्यासाठी महापालिकेने तयारी चालविली असल्याची चर्चा आहे. महापौर-उपमहापौर निवडीबाबत औत्सुक्मय वाढले आहे. त्यामुळे याबाबत महापालिकेच्या कौन्सिल विभागात चौकशी केली असता महापौर-उपमहापौर निवडणुकीबाबत अद्याप कोणतीच तयारी सुरू नसल्याचे साहाय्यक कौन्सिल सेपेटरी एफ. बी. पिरजादे यांनी सांगितले.
महापौर-उपमहापौर निवड करण्यासाठी दरवषी आरक्षण जाहीर करण्यात येते. मात्र महापालिका निवडणूक अडीच वर्षांनंतर झाल्याने या दरम्यानच्या कार्य कालावधीतील महापौर-उपमहापौर निवडीचे आरक्षण नगरविकास खात्याने जाहीर केले होते. तसेच 2021-22 या कार्य कालावधीसाठी देखील महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर केले होते.
एकूण 3 वर्षांच्या कार्यकालावधीतील आरक्षण महापालिकेला उपलब्ध झाले आहे. यापैकी कोणत्या आरक्षणानुसार महापौर, उपमहापौर निवड करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे याबाबतचे स्पष्टीकरण नगरखात्याकडे विचारण्यात आले आहे. पण नगरविकास खात्याकडून याबाबत अद्याप कोणतेच स्पष्टीकरण देण्यात आले नाही. त्यामुळे महापौर-उपमहापौर निवडीचे घोंगडे भिजत पडले आहे.
शासनाकडून स्पष्टीकरण आल्यानंतरच महापौर-उपमहापौर निवडणूक होणार आहे. तसेच ही निवडणूक प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, स्पष्टीकरण मिळाल्यानंतर प्रादेशिक आयुक्तांना पत्र पाठवून निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे महापौर-उपमहापौर निवडणुकीची तारीख ठरविण्यास महिन्याचा कालावधी लागण्याची शक्मयता आहे. येत्या 15 दिवसांत निवड करणे अशक्मय असल्याचे सांगण्यात आले. सध्या महापौर-उपमहापौर निवड करण्यासाठी महापालिकेला नगरविकास खात्याच्या स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.