प्रतिनिधी/महाबळेश्वर
गेल्या दोन दिवसांपासुन सुरू झालेल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रचे नंदनवन म्हणून प्रसिध्द असलेले महाबळेश्वर थंडीने गारठले आहे. आज महाबळेश्वरच्या पारा तीन अंशापर्यंत खाली आला तर महाबळेश्वरपासुन दोन किमी अंतरावर असलेल्या वेण्णालेक ते लिंगमळा परिसरात पारा हा शुन्यवर आला होता. पारा घसरल्याने या भागातील दवबिंदु गोठून त्याचे रूपांतर हिमकणात झाले होते. पर्यटकांची संख्या रोडावली असली तरी काही स्थानिक नागरिकांनी मात्र या पर्वणीचा आनंद लुटला.
महाराष्ट्राता सध्या थंडीची लाट आली असून सर्वत्र पारा घसरला आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिध्द असलेले महाबळेश्वर थंडीने गारठले आहे. या थंडीमुळे महाबळेश्वर शहरातील पारा तीन अंशावर खाली आला होता शहारापासुन दोन किमी अंतरावर असलेल्या वेण्णालेक ते लिंगमळा परिसरात थंडीचे प्रमाण अधिक असल्याने या भागातील पारा शहरापेक्षा अधिक खाली आला होता. या ठिकाणी पारी शुन्यावर आला होता पारा चार अंशा पेक्षा अधिक खाली घसरला तर दवबिंदु गोठण्याची प्रक्रिया सुरू होते. परंतु येथे तर पारा शुन्यावर आला होता त्यामुळे दव गोठणार असा अंदाज होता. पंरतु आज थंडीबरोबर हवा वेगाने वाहत होती, त्यामुळे या भागातील वाहनांच्या टपावर दवंबुंद गोठलेले पहावयास मिळाले. काही गवत, स्ट्रॉबेरीची पाने, वेण्णालेक येथील बोटक्लबच्या जेटीवर मोठय़ा प्रमणावर दवबिंदु गोठलेले आढळत होते. परंतु आज या ठिकाणी दवबिंदु गोठले नाही वेण्णालेक प्रमाणे लिंगमळा परिसरातील वाहनांच्या टपावर दवबिंदु गोठले असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
थंडीमुळे महाबळेश्वरच्या जनजीवनावर परिणाम झाला असून रोज सकाळी मार्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱया नागरिकांची संख्या रोडावली आहे. तसेच नेहमी गजबजलेला विल्सन पाँईंट ओस पडला होता. शहरात स्वेटर, जॅकेट, कानटोपी स्कार्फ मफलर परीधान करून लोक शहरात फिरताना दिसत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आल्याने शहरातील पर्यटकांची संख्या कमी झाल्याने दवबिंदु पाहण्याची पर्वणीचा आनंद लुटण्यासाठी मात्र पर्यटकांची उणीव भासत होती.