प्रतिनिधी/ महाबळेश्वर
विरोधकांमुळे शहराचा विकास कामांना खिळ बसल्याचा आरोप करणारया बालिश बुध्दीच्या कुमार शिंदे यांची किव येते असे आरोप करण्यापुर्वी जर आपण आत्मपरिक्षण केले असते तर अशी वायफळ व निरर्थ बडबड केली नसती मागील चार वर्षात आपण शहराचा कोणता विकास केला असा सवाल उपनगराध्यक्ष अफजल सुतार व त्यांचे सहकारी नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत उपस्थित करून नगरसेवक कुमार शिंदे यांनी केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले
मागील दोन सर्वसाधारण सभांना पालिकेतील 17 पैकी 14 नगरसेवकांनी दांडी मारल्याने नगराध्यक्षांचे पती नगरसेवक कुमार शिंदे यांनी उपनगराध्यक्ष व त्यांच्या गटातील नगरसेवकांवर विकास कामे रोखल्याचा आरोप केला या आरोपांना उत्तर देण्यासाठी विरोधी गटातील नगरसेवकांनी आशोका इन येथे पत्रकार परीषदेचे आयोजन केले होते या पत्रकार परिषदेत नगरसेवक कुमार शिंदे यांनी केलेल आरोप विरोधी गटातील नगरसेवकांनी फेटाळले ते म्हणाले की नगराध्यक्षा व त्यांचे पती यांनी सहकारी नगरसेवकांना कधी विश्वासात घेतले नाही कायम मनमानी कारभार केला सर्वसाधारण सभेपुर्वी सहाकरी नगरसेवक आपल्या प्रभागातील विकास कामांची यादी नगराध्यक्षांना देत असे परंतु ते विषय कधीच नगराध्यक्षा व त्यांचे पती कुमार शिंदे यांनी विषय पत्रिकेत घेतले नाही सहकारी नगरसेवकांच्या कामांना बगल देवुन स्वतःच्या आर्थिक फायदयाचे विषय फक्त घेतले जात होते आमच्यावर विकास कामे रोखुन धरल्याचा आरोप करणारांनी प्रथम आत्मपरिक्षण करावे गेली काही महीने नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या व्दिसदस्य समितीच कामाकाज पहात आहे मुख्याधिकारी यांनी गवळी आळी येथील भुयारी विज वाहीनीचे कामाचे निविदा मुख्याधिकारी यांनी मंजुरी दिली परंतु नगराध्यक्षांनी या कामाला अदयाप मंजुरी दिली नाही का तर ते काम उपनगराध्यक्षांच्या प्रभागातील आहे म्हणुन अशी अनेक उदाहरणे देता येतील म्हणुन कुमार शिंदे यांनी आत्मपरीक्षण केले असते तर अशी प्रकारे आरोप करून शहरावासियांची दिशाभुल करण्याची वेळ त्यांचे वर आली नसती असेही उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी पत्र.कार परिषदेत स्पष्ट केले
साडेतीन वर्षात पालिकेत मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून नगरसेवक म्हणाले की नगराध्यक्षा व त्यांचे पती असलेले नगरसेवक कुमार शिंदे यांनी कर्मचारी यांच्या साठी पावसाळी साहीत्या खेरदी केले त्या वस्तुंवर छापील किंमती असताना त्या वस्तु दुप्पट ते तिप्पट दराने खरेदी केल्या स्वच्छता अभियानाच्या नावाखाली असाच भ्रष्टाचार या महाशयांनी केला या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली देखिल मोठा भ्रष्टाचार पालिकेत झाल्याचा गौप्यस्फोट 13 नगरसेवकांनी करून या सर्वांची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांचे कडे करणार असल्याचेही उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी सांगितले
कुमार शिंदे यांनी आपली वायफल बडबड बंद करावी अन्यथा चार वर्षात जो कारभार केला आहे त्याची स्वेत पत्रिका काढुन कुमार शिंदे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा बुरखा फाडला जाईल असा इशाराही या 13 नगरसेवकांनी दिला आहे या पुर्वीच्या मुख्याधिकारी नगराध्यक्षांच्या नियमबाहय व बेकायदशीर कामाला पाठींबा देत होत्या पंरतु सध्या पालिकेत नव्याने रूजु झालेल्या मुख्याधिकारी या कर्तव्यदक्ष आहेत कायदयाच्या चाकोरी बाहेर जावुन काम करण्यास त्यांचा विरोध असतो मुख्याधिकारी यांच्या या भुमिकेमुळे नगराध्यक्षांची आवक थंडावली आहे त्या मुळे नगराध्यक्षांचे पती यांचा तोल गेला आहे कुमार शिंदे हे ज्या प्रभागातुन निवडुन आले त्या प्रभागाचा विकास देखिल या महाशयांना करता आला नाही ते काय शहराचा विकास करणार अशा शब्दात कुमार शिंदे यांनी केलेल्या टिकेची खिल्ली विरोधी गटाच्या नगसेवकांनी उडविली