वार्ताहर / कास
जावली तालुक्याच्या मेढा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱया 53 गावांसह पाचगणी पोलीस स्टेशन अंतर्गत 3 गावांचा महाबळेश्वर पोलीस स्टेशनमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव शासनाकडुन मंजुर करण्यात आला असून आता ही तापोळा विभागातील दुर्गम गावे महाबळेश्वर पोलीस स्टेशनला जोडली जाणार आहेत.
महाबळेश्वर तालुक्याच्या तापोळा विभागातील कांदाटी सोळशी कोयना या डोंगराळ दुर्गम विभागातील 53 गावे जावली तालुक्याचे विभाजन झाले तरी पुर्वीपासुन मेढा पोलीस स्टेशनला जोडली गेली होती. मात्र येथील नागरिकांना पोलीस स्टेशन संबधित कामाला मेढय़ाला जाणे आवघड होत होते. अनेक इतर शासकीय कामे महाबळेश्वरमध्येच होत होती. मात्र पोलीस स्टेशन मेढा त्यामुळे नागरिकांची येण्या जाण्याची अडचण होत असल्याने त्यांनी महाबळेश्वर पोलीस स्टेशनमध्ये जोडण्याची मागणी वारंवार केली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल यांनी शासनाकडे प्रास्तव सादर केला होता त्यांचा पाठपुरावा अधीक्षक अजकुमार बन्संल व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सतत केल्याने मेढा पोलीस स्टेशन अतंर्गत 53 व पाचगणी पोलीस स्टेशन अंतर्गत 3 आशा एकुण 56 गावांचा महाबळेश्वर पोलीस स्टेशनमध्ये समावेश करण्यात आला असल्याची माहिती अधीक्षक कार्यालयाकडुन देण्यात आली असुन त्यामुळे दुर्गम डोंगरी भागातील नागरिकांतुन समाधान व्यक्त होत असुन मेढा पोलीस स्टेशनचा कार्यभाग हलका झाला असून महाबळेश्वर पोलीस स्टेशनच्या जबाबदारीत वाढ झाली आहे.