प्रतिनिधी/ महाबळेश्वर
महाराष्ट्राची चेरापुंजी महाबळेश्वर मध्ये आज दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता .या मोसमात मागील महिन्याच्या निसर्गचक्रीवादळा सह दोन दिवस झालेल्या पावसा नंतर आज पुन्हा दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली .यामुळे प्रसिद्ध वेण्णा तलावातील पाण्याच्या पातळीत वाढ दिसून येत होती .हवामान खात्याच्या नोंदीनुसार या मोसमात आता पर्यंत 1जुन पासुन 4 जुलै पर्यंत येथे 853.4 मिमी पावासाची नोंद झाली आहे .दरम्यान या वर्षी मान्सूनचे आगमन निसर्ग चक्री वादळासह मुसळधार पावसाने झाली असली तरी जून महिन्यात पुठे तो म्हणावसं टिकला नाही .तसा संपूर्ण महिना कोरडाच गेला .जून महिन्यात 4 जून-187.4 मिमी ,16 जून – 63.0 मिमी , 18 जून ा 74.7मिमि ,19 जून- 61.0 मिमी हे चार दिवसच पावसाचे विशेष ठरले .बाकी जून महिना तसा पावसाच्या दृष्टीने बेताचाच गेला . अधिकृत नोंदी नुसार या वर्षी 1जुन ते 31 जून 716.0 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली .व आज चार जुलै सकाळ पर्यंत तो 853.4 मिमी नोंदविला गेला .गतवर्षी हि आकडे वारी सुमारे 1300 मिमी पर्यंत गेली होती .आज दिवसभर मुसळधार पाऊस सुरु होता .सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. आज सुमारे सात आठ इंच पाऊस नोंद होण्याची श्यक्यता आहे . दरम्यान आजच्या संततधारेने येथील प्रसिद्ध वेण्णा तलावातील पाण्याची पटली थोडी वाढल्याचे सांगितले जाते .