प्रतिनिधी / महाबळेश्वर
महाबळेश्वर येथे दुबाश पेट्रोलियम नजीकच्या तीव्र वळणावर कार अपघात झाला. अपघातात तीन युवक गंभीर रित्या जखमी झाले आहेत. तर कारचा अपघात चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने झाला,
मिळालेल्या माहीती नुसार महाबळेश्वर येथील दुबाश पेट्रोलियम नजीकच्या तीव्र वळणावर वाईहुन महाबळेश्वरच्या दिशेने जाताना हा चारचाकीचा अपघात झाला. भरधाव वेगात निळ्या रंगाची अल्टो कार चालकाचा ताबा सुटल्याने थेट एका झाडावर जाऊन आदळल्याने अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त कारचा चकाचुर झाला आहे. तर अपघातातील जखमींना वाई व सातारा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
या जखमींमध्ये नयन सपकाळ ( वय २४), शुभम फळणे (वय २५ ) व शेखर कुरुंदे (वय २४) हे तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत. हे युवक वाईहुन महाबळेश्वरच्या दिशेने येत असताना शुक्रवारी रात्री ही घटना घडली. घटनास्थाळावरुन रक्तबंबाळ अवस्थेतील जखमी युवकांना परिसरातील नागरिकांनी मोठ्या शर्थीने गाडीबाहेर काढत वाई व सातारा येथे उपचारार्थ दाखल केले. या अपघातात अल्टो कारचा समोरचा भाग चक्काचूर झाला आहे.