प्रतिनिधी / महाबळेश्वर
अल्पवयीन विदयार्थीनीवर बलात्कार करणाऱ्या नराधम मुख्याध्यापकास महाबळेश्वर पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली दरम्यान पिडीत मुलीच्या एका अज्ञात मैत्रिणीने दाखविलेल्या धाडसामुळेच बलात्कारी मुख्याध्यापक गजाआड झाला अशी शहरात चर्चा सुरू आहे.
शहरातील नावाजलेल्या एका हायस्कुल मधील दिलीप रामचंद्र ढेबे या मुख्याध्यापकाने आपल्या पदाचा दबाव आणुन दहावित शिकत असलेल्या एका 15 वर्षिय मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण महिलादिनीच उघडकीस आले या प्रकरणी पोलिसांनी शोध घेवुन तात्काळ मुख्याध्यापकाच्या मुसक्या आवळुन त्यास जेरबंद केले आज पोलिसांनी त्यास जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता जिल्हा न्यायाधिशांनी त्यास सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी अशी मागणी करताना महाबळेश्वर पोलिसांनी उत्तम प्रकारे बाजु मांडली त्या मुळे न्यायाधिशांनी पोलिसांची मागणी तात्काळ मान्य करून आरोपीस सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली
मुख्याध्यापक आपल्यावर वारंवार आत्याचार करीत असल्याची माहीती पिडीत मुलीने आपल्या एका मैत्रिणीला सांगितली होती.
त्याच हायस्कुल मध्ये 22 फेब्रुवारी रोजी लैंगिक आत्याचारा वर महाबळेश्वर पोलिस ठाण्यचाचे सहा पो निरिक्षक अब्दुल हादी बिद्रि यांनी मुलिंना मार्गदर्शन केले होते. या वेळी चाईल्ड हेल्प लाईन ची माहीती देवुन हेल्प लाईनचा 1098 हा क्रमांक पोलिसांनी मुलींना दिला होता तसेच हा नंबर शाळेच्या फलकावर देखिल लावला होता पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार पिडीत मुलीच्या एका मैत्रिणीने सहज हेल्प लाईनचा नंबर फिरवला तर तिकडुन प्रतिसाद मिळाला तेव्हा पिडीत मुलीच्या मैत्रिणीने आपल्या मैत्रिणीवर आत्याचार होत असल्याची माहीती दिली या आत्याचाराची पोलिसांनी गंभीर दखल घेवुन महाबळेश्वर पोलिसांनी तपास करण्याचे आदेश दिले.
वरीष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार महाबळेश्वर पोलिसांनी गेली पाच दिवस तपास करून पिडीत मुलीचा शोध घेतला पिडीत मुलीला विश्वासत घेतले व अल्पवयीन मुलीवरील आत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले पिडीत मुलीच्या मैत्रिणीने जर हेल्पलाईन वरून माहीती दिली नसती तर मुख्याध्यापकाच्या तावडीतुन पिडीत मुलीची सुटका झाली नसती व पुढे अनेक वेळा ती पिडीत मुलगी आत्याचारास बळी पडली असती पिडीत मुलीच्या एका अज्ञात मैत्रिणीने समय सुचकता दाखवुन केलेल्या धाडसामुळे नराधम मुख्याध्यापक गजाआड झाला. त्या अज्ञात मैत्रिणीचे शहरातुन कौतुक केले जात आहे. या प्रकरणाचा तपास करून आरोपीच्या मुसक्या आवळणारे महाबळेश्वर पोलिसांचे देखील शहरातुन कौतुक केले जात आहे.