प्रतिनिधी/ खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील खवटीनजीक झालेल्या प्रुझर कार अपघातात एकजण ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडल़ी या अपघातात अन्य 6 जण जखमी झाले आहेत़
जखमींना उपचारार्थ तातडीने कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आल़े या अपघातातील मृताचे नाव समजू शकले नाह़ी ही कार दापोली येथून साताऱयाच्या दिशेने चालली असताना अपघात घडला. या अपघाताचे वृत्त कळताच कशेडी वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचल़े याशिवाय मदतकर्त्या संघटनांनीही धाव घेत जखमींना मदतकार्य केल़े या अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाल़ा अपघातग्रस्त वाहने हटवल्यानंतर विस्कळीत वाहतूक पूर्ववत झाल़ी