प्रतिनिधी/ उंब्रज
आशियाई महामार्गावर बेलवडे हवेली (ता. कराड) गावच्या हद्दीत ऊस वाहतूक करणाया ट्रक्टरने अचानक पेट घेतल्याने ट्रक्टर जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. रविवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर महामार्गावर काहीकाळ थरार निर्माण झाला होता. दरम्यान यावेळी वाऱयाचा वेग जोरात असल्याने क्षणार्धात आग भडकली. तळबीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कराड पालिकेच्या अग्निग्नशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग विझविण्यात आली. मात्र ट्रक्टर जळून खाक झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, महामार्गावर बेलवडे हवेली गावच्या हद्दीत कराड ते उंब्रज दिशेने ऊस भरून ट्रक्टर कारखान्याकडे निघाला होता. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सदरचा ट्रक्टर बेलवडे गावच्या हद्दीत आल्यानंतर ट्रक्टरने अचानक पेट घेतला. त्यामुळे चालकांची भंबेरी उडाली. चालक हरिश्चंद्र केशव काशिद राहणार बीड यांनी ट्रक्टर थांबून बाहेर उडी घेतली. वाऱयाचा वेग प्रचंड असल्याने ट्रक्टरने जोराचा पेट घेतला. त्यामुळे महामार्गावर ज्वाळा दिसत होत्या. दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कराड पालिकेचा अग्निग्नशामक दलाचा बंब बोलावण्यात आला. काहीवेळ वाहतूक बंद करण्यात आली.त्यानंतर ही आग विझविण्यात आली. मात्र सदर आगीत ट्रक्टर खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटनेचा पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत तळबीड पोलिसांकडून सुरू होते.